सांगलीत आठ दिवसाचा संपूर्ण लॉकडाऊन

    दिनांक :04-May-2021
|
जयंत पाटलांनी केले ट्विट 
सांगली,
सांगलीत कोरोना संसर्गाचा कहर वाढल्याने सांगलीत आठ दिवसाचा तातडीचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. उद्या 5 मे रोजी मध्यरात्रीपासून हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी तशी घोषणाच केली आहे. आपल्या सर्वांचा जीव वाचणं महत्त्वाचा आहे. त्यासाठीच हा लॉकडाऊन करण्यात येत असल्याचे भावनिक आवाहनही त्यांनी केले.  जयंत पाटील यांनी ट्विट करून या लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
 
 
san_1  H x W: 0
 
सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ५६८ वर पोहोचली असून काल(सोमवारी) ४० रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेवून सांगली जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येत असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. सांगलीतील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. प्रशासनाशी चर्चा करून सांगली जिल्ह्यात ५ मे रोजी मध्यरात्रीपासून ८ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.