कोल्हापूरमध्ये 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन

    दिनांक :04-May-2021
|
कोल्हापूर,
राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे आता जिल्हास्तरावर लॉकडाऊनचा निर्णय घेतला जात आहे. सांगलीपाठोपाठ आता कोल्हापूरमध्येही 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यात बुधवारी दुपारपासून कडक लॉकडाऊन लागू होणार असल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे.
 
gbt_1  H x W: 0 
 
 
सध्या राज्यात 15 मेपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यानंतर आता जिल्हा पातळीवर कडक लॉकडाऊन लावले जात आहे. सांगली जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यात 8 दिवसाच्या कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. जिल्ह्यात 5 मे रोजी मध्यरात्रीपासून 8 दिवसांचा लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचे पाटील म्हणाले. तुम्हा सगळ्यांच्या मदतीनेच कोरोनावर मात करायची आहे. त्यामुळे घरीच रहा, सुरक्षित रहा असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.