साखरखेर्डा येथे 128 बाधित, कोविड सेंटरची मागणी

    दिनांक :04-May-2021
|
साखरखेर्डा,  
प्राथमिक आरोग्य केंद्रात आठ दिवसांत 128 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. तरीही साखरखेर्डा येथील कोव्हीड सेंटरचा प्रश्न स्मरण पत्राच्या फाईलमध्येच अडल्याने तो प्रश्न तात्काळ निकाली काढावा अशी मागणी होवू लागली आहे.साखरखेर्डा गावाची लोकसंख्या 20 हजार असून परीसरातील 23 खेडी या प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येतात. कोरोना संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी गावातील आणि परिसरातील शेकडो नागरिक, महिला आपली कोरोना तपासणी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात येत आहे. गेल्या सोमवार पासून आरटीपीसीआरच्या 116 तर शीघ्र तपासणी केली असता 16 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. हा आकडा साखरखेर्ड्यासाठी खुपचं मोठा असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तडस यांनी तत्काळ दखल घेऊन साखरखेर्डा येथे कोव्हीड सेंटर सुरु करावे अशी मागणी सर्व स्तरातून होवू लागली आहे.
 

 ter _1  H x W: 
 
साखरखेर्डा येथे कोव्हीड सेंटर सुरू करावे यासाठी स्थानिक राजकीय नेत्यांनी पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्याकडे मागील आठवड्यात मागणी केली होती. सहकार विद्या मंदिराची इमारत कोव्हीड सेंटरसाठी उपयूक्त असल्याचा अहवाल तहसीलदार सुनील सावंत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.रविंद्र साळवे यांनी दिला होता. 50 खाटाचे कोव्हीड सेंटर सुरु करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तडस यांच्याकडे अहवाल पाठविण्यात आला होता. परंतू या अहवालाची फाईल आजही त्यांच्याकडे पडून असून आज स्मरण पत्र दिल्याचे जबाबदार अधिकार्‍यांकडून माहिती मिळाली आहे. यासाठी पालक मंत्र्यांनाच अधिकार्‍यांना स्मरण पत्र देण्याची वेळ येवू देवू नये अशा संतप्त प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत.