583 रुग्णांची कोरोनावर मात; 513 बाधित

    दिनांक :04-May-2021
|
तभा वृत्तसेवा
गोंदिया,  
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज मंगळवार 4 मे रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 513 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. 583 बाधितांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले. जिल्ह्यात 4 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आजपर्यंत 34,918 रुग्ण कोरोनाबाधित आढळले तर 29,473 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. आता जिल्ह्यात 4882 बाधित रुग्ण आहेत. क्रियाशील असलेले 3699 बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 563 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 84.40 टक्के आहे.
 

corona_1  H x W 
 
बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1 टक्के आहे तर द्विगुणीत दर 22.54 प्रति दिवस आहे. जिल्ह्यात आज बाधित आढळलेल्यांमध्ये गोंदिया तालुक्यातील 161, तिरोडा 28, गोरेगाव 29, आमगाव 57, सालेकसा 52, देवरी 94, सडक अर्जुनी 54, अर्जुनी मोरगाव 30 आणि इतर राज्य, जिल्ह्यातील 8 रुग्णांचा समावेश आहे. येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत कोरोना विषाणूच्या तपासणीसाठी आतापर्यंत 136542 नमुने पाठविण्यात आले. यामध्ये 111030 नमुने नकारात्मक आले तर 18055 नमुने बाधित आले. 4131 नमुन्यांचा अहवाल प्रलंबीत आहे. रॅपिड अँटीजेन चाचणीतून आतापर्यंत 139123 व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये 119659 व्यक्तींचे अहवाल नकारात्मक आले तर 19464 व्यक्तींचे अहवाल बाधित आढळले.