नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना भरपाई द्या

    दिनांक :04-May-2021
|
- माजी मंत्री राजकुमार बडोले यांची मागणी
तभा वृत्तसेवा
अर्जुनी मोर,
तालुक्यात गत तिन दिवसांपासून पडत असलेल्या पुर्वमोसमी पावसामुळे केशोरी परिसरातील उन्हाळी धानाचे प्रचंड नुकसान णले आहे. नुकसानग‘स्त शेतीची पाहणी करून पंचनामे करून त्यानुसार नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी पत्राद्वारे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना केली आहे. गेल्या तीन दिवसापासून केशोरीसह परिसरात वादळी वार्‍यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरीवर्ग संकटात सापडला आहे. निसर्गाच्या अनियमिततेमुळे उभ्या पिकावर पाणी सोडण्याची वेळ बळीराजावर आली आहे.
 

fgg _1  H x W:  
 
खरीप हंगामातील धानाचे चुकारे, बोनसची रक्कम आणि उन्हाळी धान खरेदीचा प्रश्न अंधारी आहे. शेतकर्‍यांचा कुणी वालीच नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील खरेदी झालेले धान अजुनपर्यंत भरडाईसाठी झाले नसल्याने गोदामे भरुन आहेत. अशात उन्हाळी धान खरेदीचा प्रश्न उभा ठाकला आहे. शेतकर्‍यांनी उन्हाळी धानाची कापणी व मळणी सुरु केली असताना तालुक्यासह केशोरी परिसरात अवकाळी पावसाने वादळ व गारपिटीसह सुरवात केल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकर्‍यांची विदारक स्थिती लक्षात घेता शासनाने त्वरीत पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी बडोले यांनी मंत्री वडेट्टीवार यांना पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.