कोरोनाचा नवा स्ट्रेन हजार पटीने धोकादायक

    दिनांक :04-May-2021
|
- 10 पटीने संक्रमक असल्याचा दावा
हैदराबाद, 
उत्तर हैदराबादच्या वैज्ञानिकांनी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला कारणीभूत असलेल्या स्ट्रेनचा शोध लावला आहे. हा स्ट्रेन पूर्वीच्या सर्व विषाणूंपेक्षा हजार पटीने धोकादायक असल्याचा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. तर, हा स्ट्रेन अन्य स्ट्रेनच्या तुलनेत 10 पटींनी अधिक संक्रमण करणारा आहे. या नव्या स्ट्रेनमुळेच देशातील काही भागात कोरोनाने हाहाकार माजविला असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे.
 
natr_1  H x W:
 
देशभरात कोरोना महामारीने जे भीषण रूप धारण केले आहे त्याला हाच स्ट्रेन जबाबदार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे संशोधन हैदराबादच्या सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी आणि गाझियाबादची अ‍ॅकॅडमी फॉम साइंटिफिक अँड इनोव्हेशन सेंटरच्या वैज्ञानिकांनी केले आहे. या म्युटेंटला ‘एन440के’ असे नाव देण्यात आले आहे. हा नवा स्ट्रेन आंध्रप्रदेशच्या कर्नूल शहरात पहिल्यांदा सापडला आहे. आता हा म्युटेंट आंध्रप्रदेश, तेलंगानासह देशाच्या अन्य राज्यांमध्ये पसरला आहे. कोरोनाचे जेवढे बाधित देशात सापडत आहेत, त्यापैकी एक तृतियांश बाधित हे याच व्हेरिअंटमुळे येत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये देशातील 50 टक्के कोरोना बाधित हे चार राज्यांमध्ये सापडले आहेत. यामध्ये कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगाना आणि छत्तीसगड यांचा समावेश आहे. या चार राज्यांमध्ये कोरोनाचा हा नवा वेगवान स्ट्रेन वेगाने पसरत आहे.