क्रिकेट ऑस्ट्रेलियाची भारताला 50 हजार डॉलर्सची मदत

    दिनांक :04-May-2021
|
मेलबोर्न, 
भारतात कोरोनाची दुसरी लाट आली असून रोज मोठ्या संख्येत बाधित आढळत आहेत. या अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जगभरातील अनेक देश भारताच्या मदतीला येत आहेत. अशीच मदत क्रिकेट विश्वातून करण्यात आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कोरोना विरुद्धच्या लढाईत भारताला 50 हजार ऑस्ट्रेेलियन डॉलर इतकी मदत दिली आहे.
 
nat_1  H x W: 0
 
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या शिवाय आणखी निधी गोळा करणार असल्याचे म्हटले आहे. खेळाडूंच्या संघटना आणि युनिसेफच्या मदतीने आणखी निधी गोळा केला जाणार आहे. भारतातील कोरोना संकटात क्रिकेट ऑस्ट्रेलिया मदत करीत आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियातील क्रिकेटपटू, संघटना आणि युनिसेफ जास्तीत जास्त निधी गोळा करेल असे सीएने म्हटले आहे. भारतात आलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत बाधितांना प्राणवायूची कमतरता जाणवत आहे. सध्या ऑस्ट्रेलियाचे काही खेळाडू भारतात सुरू असलेल्या आयपीएलच्या 14 व्या हंगामात खेळत आहेत. यापैकी काही खेळाडूंनी देशातील कोरोनाविरुद्धच्या लढाईत आर्थिक मदत देऊ केली आहे.