नेपाळमध्ये उड्डाणांवर बंदी

    दिनांक :04-May-2021
|

INTR_1  H x W:
 
काठमांडू, 
कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर नेपाळने सोमवारी मध्यरात्रीपासून देशांतर्गत, तर बुधवारी रात्रीपासून सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर 14 मे पर्यंत बंदी घातली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री हृदयेश त्रिपाठी यांनी दिली. केवळ चार्टर विमानांना परवानगी असणार आहे. यासह नेपाळने देशात येणार्‍या प्रत्येकासाठी विलगीकरण देखील अनिवार्य केले आहे. विदेशी नागरिकांना 10 दिवस संस्थात्मक विलगीकरणात राहणे बंधनकारक करण्यात आले आहे तसेच 72 तासापूर्वी कोरोना नकारात्मक अहवाल देखील अनिवार्य केला आहे. 29 एप्रिलपासून देशातील बस सेवा देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.