वारंवार सीटी स्कॅनने उद्भवणार गंभीर आजार

    दिनांक :04-May-2021
|
नवी दिल्ली, 
देशातीत कोरोनाच्या स्थितीने तळागाळापासून ते उच्चभ्रूपर्यंत सर्वांना आपल्या विळख्यात घेतले आहे. त्यात आरोग्य व्यवस्थेवर ताण पडला असून कोणाला बेड मिळत नाहीये तर कोणाला ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्यामुळे घाबरून जाऊन लोक ज्या पद्धतीचे उपचार घेत आहेत ते पाहता देशातील आरोग्य यंत्रणेसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे. कोरोनावर उपचार घेत असताना वारंवार सीटी स्कॅन करणे हे जीवावर बेतू शकत. त्यामुळे वेळीच सावध होण्याचा इशारा एआयआयएमसकडून देण्यात आला आहे. कोरोनाचे उपचार करताना सीटी स्कॅनचा गैरवापर केला जात असून त्यामुळे कॅन्सरचा धोका उद्भवण्याची शक्यता असल्याचे  मत एआयआयएमसचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे.

ct _1  H x W: 0
 
आपण जर पॉझिटिव्ह असाल आणि आपल्यात कोरोनाची सौम्य लक्षणे असतील तर आपल्याला सीटी स्कॅन करण्याची आवश्यकता नाही. कारण अनेक वेळा सीटी स्कॅनमधून जो रिपोर्ट येतो त्यामध्ये चुका असल्याचे लक्षात आले आहे. त्याचा परिणाम रुग्णावर होऊ शकतो. एआयआयएमसचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, 'रेडिएशन संबंधित एक डेटाचे विश्लेषण करताना लक्षात आलं आहे की, लोक तीन-तीन दिवसांत सीटी स्कॅन करत आहेत. डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, 'जर कोरोनाबाधित रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असेल आणि त्याला सौम्य लक्षणे दिसत असतील तर अशा रुग्णांनी सीटी स्कॅन करण्याची आवश्यकता नाही. कारण एक सीटी स्कॅन हा 300 एक्स रेच्या बरोबर असतो. खासकरून तरूणांनी जर वारंवार सीटी स्कॅन केले तर त्यांच्यामध्ये कॅन्सरचा धोका उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे गरज नसताना सीटी स्कॅन करून आपल्या शरीराची हाणी करू नये.