आयपीएलचा उद्याचा सामनाही रद्द

    दिनांक :04-May-2021
|
नवी दिल्ली,
आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्जसंघाचा गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मपती बालाजी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर संघ व्यवस्थापनानं आजचा सामना खेळण्यास असमर्थता दाखवली आहे. त्यामुळे चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात बुधवारी होणारा सामना देखील रद्द करण्यात आला आहे.  "दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणारा चेन्नई विरुद्ध राजस्थान यांच्यातील उद्या होणारा सामना आयपीएलच्या कोरोना प्रतिबंधक नियमांनुसार पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 

ck _1  H x W: 0 
 
चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मपती बालाजी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं त्याच्याशी संपर्कात आलेल्या सर्व खेळाडूंना क्वारंटाइन नियमांचं पालन करावं लागणार आहे. त्यांची दैंनदिन पातळीवर पुढील काही दिवस कोरोना चाचणी होणार आहे", असं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं. लक्ष्मीपती बालाजी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे आणि त्याच्याशी संपर्कात असलेले संघातील खेळाडूंच्या पुढील तीन चाचण्या जोवर निगेटिव्ह येत नाहीत तोवर संघ सामना खेळू शकत नाही, अशी भूमिका चेन्नई सुपरकिंग्ज संघानं घेतली आहे. संघाच्या खेळण्याबाबत चित्र स्पष्ट होण्यासाठी पुढील सहा दिवसांचा कालावधी लागेल असं चेन्नईकडून सांगण्यात आलं आहे.