भारत कोरोना मृत्यूंच्या यादीत जगात तिसरा

    दिनांक :04-May-2021
|
नवी दिल्ली,
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात पूर्णपणे पोखरून काढले आहे. प्रत्येक दिवशी लाखोंच्या संख्येने विक्रमी करोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून करोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे त्यामुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसात देशात साडेतीन हजारांच्या आसपास रुग्णांचा कोरोना, ऑक्सिजनअभावी बेड न मिळाल्याने मृत्यू होत आहे. भारतातील एकूण कोरोना मृतांची संख्या सव्वादोन लाखांच्या जवळ जाऊन पोहोचली आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे कोरोना मृत्यूंच्या यादीत जगात भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील २४ तासांतील आकडेवारी जाहीर केली आहे. आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेली आकडेवारी काहीसा दिलासा देणारी आहे. मात्र मृत्यूंच्या बाबतीत चिंता कायम आहे.
 

io _1  H x W: 0 
 
 
मृत्यूंच्या संख्येत घट नाही
देशातील कोरोना रुग्णवाढ मंदावली असल्याचे दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात तीन लाख ५७ हजार २२९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ लाख २० हजार २८९ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. म्हणजे नवीन रुग्ण आणि घरी परतलेले रुग्ण ही संख्या दिलासा देणारी आहे. मात्र, देशात दररोज होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत कोणतीही घट झाली नसल्याचे दिसत आहे.देशात गेल्या २४ तासांत ३ हजार ४४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण करोनाबळींचा संख्या दोन लाख २२ हजार ४०८ इतकी झाली आहे.