वेळेपुर्वीच शाखेला कुलूप

    दिनांक :04-May-2021
|
- परसवाडा शाखेतील प्रकार
तभा वृत्तसेवा
तिरोडा,
कोरोना संक‘मनाचा वाढता उद्रेक पाहून राज्यातील बँकांच्या वेळा ठरविण्यात आल्या आहेत. स्थानिक परिस्थिती नुसार वेळा निश्चित करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील बँकांच्या वेभ सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत ठेवण्यात आली आहे. परंतु तालुक्यातील परवाडा येथाील बँक आँफ इंडिया शाखेत निर्धारित वेळेपुर्वीच सर्वसामान्य ग्राहकांसाठी व्यवहार बंद केले जात आहे. या प्रकारामुळे बँक ग्राहकांमध्ये तीव‘ संताप व्यक्त केला जात असून कारवाई करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे. परिसरातील 15 ते 20 गावांसाठी परवाडा येथे एकमेव राष्ट्रीयीकृत बँक शाखा आहे. येथे हजारो नागकिांची खाती आहेत. बँकेतील कर्मचार्‍यांच्या व्यवहारामुळे शाखा नेहमी प्रकाशझोतात राहते.
 

dfd _1  H x W:  
 
येथील कर्मचारी नियमांना डावलून त्यांच्या मर्जीने काम करत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. देवानघेवाणीसाठी ग‘ाहक सकाळी 9 वाजतापासूनच बबँकेसमोर गर्दी करतात. खाते व अन्य व्यहारासंबंधित माहिती विचारल्यास ती मिळत नसल्याचे ग्राहकांचे म्हणने आहे. शाखेत कार्यरत चपराश्याची वर्तणूक सौजन्यपुर्वक नाही. अनेकदा चपराशी मद्यपान करून कर्तव्य बजावत असल्याचे ग्राहकांकडून सांगीतले जाते. ग्राहकांनी काही विचारणा केल्यास उद्धटपणे वागणूक दिली जात असल्याचे म्हणने आहे. निर्धारित वेळेपुर्वीच शाखेच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात येते. ग्राहकांनी विनवणी करून देखील त्यांचे ऐकले जात नाहि. कामानिमित्त आलेल्यांना चपराशी परतवून लावतो. परसवाडा शाखेतील प्रकाराकडे बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.