ममता बॅनर्जींचा उद्या शपथविधी

    दिनांक :04-May-2021
|
- विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड
कोलकाता, 
ममता बॅनर्जी सलग तिसर्‍यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी सोमवारी एकमताने निवड करण्यात आली असून, 5 मे रोजी राजभवनात त्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
 
natr_1  H x W:
 
बंगालमध्ये सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी 6 मे रोजी होणार आहे. ममता बॅनर्जी आज सायंकाळी राज्यपाल जगदीप धनकड यांची भेट घेतली आणि सरकार स्थापन करण्याचा दावा सादर केला. बॅनर्जी यांनी पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची पक्षाच्या मुख्यालयात बैठक घेतली. या बैठकीला निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर उपस्थित होते, अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस पार्थ चॅटर्जी यांनी दिली. बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने 292 पैकी 213 जागांवर विजय प्राप्त केला आहे. दरम्यान, बॅनर्जी यांनी आजच्या बैठकीत आमदारांंना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
 
2024 साठी एकजूट व्हा
2024 मधील लोकसभा निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले. माझ्या पक्षाला विजय मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे, नवीन पटनायक, रजनीकांत, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल, अमरिंदरसिंग यांनी अभिनंदनासाठी फोन केले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्याप फोन केला नसल्याचे त्या म्हणाल्या.