मुस्लिम बांधवांनी लसीकरण करून घ्यावे- नगराध्यक्ष गवळी

    दिनांक :04-May-2021
|
मेहकर, 
गवळी यांनी समाज बांधवांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भीती न बाळगता शासनाकडून सुरू असलेल्या लसीकरणचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष कासम गवळी यांनी केली आहे.मुस्लिम कोअर कमिटी ची आभासी पद्धतीने बैठक 30 रोजी पार पडली. यावेळी नगराध्यक्ष कासम गवळी त्यांनी आवाहन केले. लस घेतल्यामुळे माणूस मरतो हा गैरसमज समाजातील मंडळांनी दूर करावा. या लसीमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. कोरोनाची आलेली ही दुसरी लाट फार भयानक आहे. कोरोनाच्या आलेल्या पहिल्या लाटेमध्ये साधारणपणे 60 वर्षांवरील व्यक्तीचा मृत्यू झाला होता. पण आता आलेली ही दुसरी लाट फार भयानक आहे. यामध्ये तरुण व्यक्ती तसेच लहान मोठे मुले यांनाही कोरोनाची लागण होऊन यामधे त्यांचा मृत्यु होत आहे.
 

mus_1  H x W: 0 
 
यासाठी आपण सर्वांनी शासनाकडून वेळोवेळी आलेल्या सूचनांचे पालन करणे फार महत्त्वाचे आहे. तसेच सामाजिक अंतर ठेवणे, तोंडाला मुखच्छादन लावणे आवश्यक आहे. आपल्याला खोकला, सर्दी पडसे झाले तर लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवावे, उपचार करुन घ्यावा. त्याचप्रमाणे कोरोना चाचणी करून घ्यावी. त्याचप्रमाणे आपण घरीच राहून कोरोनापासून आपला बचाव करू शकतो. आपणाला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून नगर परिषदेचे तसेच पोलीस स्टेशनचे कर्मचारी वृंद आपल्या आरोग्याची काळजी न करता आपल्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. यासाठी आपणही त्यांना चांगला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन कासम भाई गवळी यांनी या बैठकीत केले.
 
यावेळेस जिल्हा मुस्लिम कोअर कमिटीचे पदाधिकारी डॉ.अस्लम खान,शेगाव फिरोझ खान शेगाव, बादशहा खान लोणार, रियाझ शेख, अब्दुल राजीक, कदिर कुरेशी, जलील शेख, रशीद खा जमादार मलकापूर, आसिफ ठेकेदार, कमर अफजल खान,सय्यद साजिद मानस गाव, इद्रिस भाई, इनायत खान, मो. सईद अन्सारी,सय्यद बिलाल भाई, शेख नबिल,तौसिफ शेख, शेख असगर, सलमान शेख, मो.हाफिज मेहकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करून बुलडाणा जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांना कोरोनाची लस घेण्याचे आवाहन केले. शेवटी ड. शहजाद खान लाखन वाडा यांनी आभासी बैठकीमध्ये सामील झालेल्या सर्व पदाधिकारी व सदस्याचे आभार मानले.