अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू

    दिनांक :04-May-2021
|
- आ. अग्रवालांचा शासनाला इशारा
तभा वृत्तसेवा
गोंदिया,  
रब्बी हंगामातील धान खरेदी करण्याचा मनसुबा राज्य शासनाचा दिसून येत नाही. आभासी नोंदणीची अट घालून शेतकर्‍यांना अडचणीत आणण्यात आले आहे. तर दुसरीकडे गोदाम भरून असल्याने धान खरेदी करण्यास टाळाटाळ सुरू आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात धान खरेदी सुरू होईल, असे दिसून येत नाही, असा आरोप आमदार विनोद अग्रवाल यांनी केला असून जर शेतकर्‍यांचे धान खरेदी करण्यात आले नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी पालकमंत्र्यांना दिला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक हे रविवार 2 मे रोजी जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते.
 

ddf _1  H x W:  
 
दरम्यान त्यांनी कृषी विभागाचा आढावा घेतला. याप्रसंगी आमदार विनोद अग्रवाल यांनी गोंदिया जिल्ह्यात उन्हाळी हंगामाचे धान खरेदी करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली नाही. एजंसीने धानखरेदी केंद्रांना मंजुरी तर दिली मात्र, खरीप हंगामातील धानाची उचल झाली नाही तर खरेदी करण्यात आलेले धान कुठे ठेवावे ? असा प्रश्न केंद्र संचालकांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक केंद्र संचालक धान खरेदीस टाळाटाळ करीत आहेत. दुसरीकडे आभासी नोंदणीची अट ठेवून शेतकर्‍यांना अडचणीत आणण्याचा प्रकार राज्य शासनाकडून केला जात आहे. धान खरेदी केंद्राच्या बाबतीत राज्य सरकारचे जनप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही अग्रवाल यांनी केला आहे. जर धानखरेदी सुरू झाली नाही तर आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला पालकमंत्र्यांना दिला.