पाकी सैन्याने केले संघर्षविरामाचे उल्लंघन

    दिनांक :04-May-2021
|
जम्मू, 
पाकिस्तानच्या सैनिकांनी जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवरील भारतीय जवानांच्या छावण्यांवर सोमवारी सकाळी अंधाधुंद गोळीबार करून संघर्षविरामाचे उल्लंघन केले.
 
natrt_1  H x W:
 
25 फेबु्रवारी रोजी सीमेवर शांतता कायम राखण्यासाठी पाकिस्तानच्या लष्करी अधिकार्‍यांनी स्वत:हून पुढाकार घेत संघर्षविरामाचा करार नव्याने केला होता. तेव्हापासून आतापर्यंत सीमेवर शांतता होती, पण आज पाकी सैनिकांनी गोळीबार करून हा करार मोडित काढला. भारतीय जवानांनीही या नापाक कारवायांना सडेतोड उत्तर दिले, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या प्रवक्त्याने दिली. सकाळी सहा वाजेपासूनच पाकी सैनिकांच्या बंदुका व तोफा रामगढ सेक्टरमध्ये आग ओकू लागल्या होत्या. तथापि, यात भारतीय जवान आणि नागरिकांना कुठलीही दुुखापत झाली नाही, असे प्रवक्ता म्हणाला.