12 ते 15 वयोगटातील बालकांना फायझरची कोरोना लस

    दिनांक :04-May-2021
|
वॉशिग्टन,
12 वर्षावरील बालकांना फायझरची कोरोना लस देण्यास, अमेरिकेतील अन्न आणि औषधे प्रशासनाकडून  मान्यता मिळण्याची शक्यता आहे. हि मान्यता याच आठवड्यात मिळण्याची शक्यता असून, पुढच्या आठवड्यापासून 12 ते 15 वयोगटातील बालकांना कोरोनाची लस देण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

intre _1  H x W 
 
अमेरिकेतल्या 16 वर्षावरील सर्वांना फायझरची लस देण्याच्या निर्णयाला या आधीच मंजुरी मिळाली आहे. फायझर कंपनीने 12 ते 15 वयोगटातील बालकांवर आपल्या लसीच्या उपयुक्ततेचा अभ्यास, गेल्या महिन्यापूर्वीच केला आहे. त्यामध्ये ही लस बालकांवरही प्रभावी असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे आता या लसीच्या वापराला या आठवड्यातच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकेतल्या लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 10.5 कोटी नागरिकांचे पुर्णपणे लसीकरण झाले असून, 14.7 कोटी लोकांना लसीचा किमान एक डोस देण्यात आला आहे. अमेरिकेतील नागरिकानीं कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्याने, ते आता विनामास्क घराबाहेर फिरु शकतात. या नागरिकांना छोट्या ग्रुपमध्ये भेटता येईल, परंतु त्यांनी गर्दीची ठिकाणे टाळणे  आवश्यक आहे. गेल्या आठवड्यात हा महत्त्वाचा निर्णय सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अण्ड प्रिव्हेन्शन अमेरिकेच्या या संस्थेने घेतला आहे. या निर्णयामुळे कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.