कोरोना काळात सेवा देणार्‍या डॉक्टरांना सरकारी नोकरीत प्राधान्य

    दिनांक :04-May-2021
|
- पंतप्रधान मोदी यांची घोषणा
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, 
देशात वाढत असलेली कोरोनाच्या नव्याबाधित0ांची संख्या तसेच कमी पडत असलेल्या आरोग्यसेवेला दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी काही महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा केली. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या संख्येत मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. कोरोना काळात सेवा देणार्‍या डॉक्टरांना सरकारी नोकरीत प्राधान्य देण्यात येणार आहे.
 
natr_1  H x W:
 
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी आवश्यक असलेली नीट-पीजी परीक्षा चार महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. 31 ऑगस्टच्या आधी आता ही परीक्षा होणार नाही. यामुळे मोठ्या संख्येत डॉक्टर कोरोना बाधितांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत. कोरोनाची हलकी लक्षण असलेल्या बाधितांच्या देखभालीसाठी तसेच टेलिमेडिसिन सुविधेसाठी एमबीबीएस अंतिम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांचा उपयोग केला जाणार आहे. यामुळे वरिष्ठ डॉक्टरांवरील ताण कमी होण्यास मदत होईल.
 
 
शंभर दिवस सेवा देणार्‍यांना पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला असलेले विद्यार्थी निवासी डॉक्टरांची नवी तुकडी येईपर्यत सेवा देऊ शकतील. जे डॉक्टर कोरोनाबाधितांसाठी सलग 100 दिवस सेवा देतील, त्यांना सरकारी सेवेत सामावून घेतांना प्राधान्य देण्याची घोषणाही सरकारने केली आहे. यासोबतच 100 दिवस सेवा देणार्‍या डॉक्टरांना पंतप्रधान कोविड राष्ट्रीय सेवा सन्मान पुरस्कार देऊन प्रमाणपत्राने सन्मानित केले जाणार आहे. कोरोनाच्या सेवेत सहभागी होणारे वैद्यकीय विद्यार्थी आणि डॉक्टरांचे आधी लसीकरण करुन घेतले जाईल, त्याचप्रमाणे त्यांना वैद्यकीय विमा सुरक्षा कवचाचा फायदाही दिला जाईल. बीएससी जीएनएम अभ्यासक्रम केलेल्या परिचारिकांना वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली थेट कोरोना वार्डात पूर्णवेळ तैनात केले जाणार आहे.