वाणीने दिला जुन्या आठवणींना उजाळा

    दिनांक :04-May-2021
|
मुंबई, 
वाणी कपूर आता बॉलीवूडमध्ये प्रस्थापित झाली आहे. वॉर चित्रपटाला मिळालेल्या भव्य यशानंतर तिची लोकप्रियता वाढली आहे. आता ती आगामी शमशेराच्या कामात व्यस्त आहे. मात्र तरीही एका मासिकाला मुलाखत देण्यासाठी तिने वेळ काढला आणि यावेळी तिने तिच्या कारकिर्दीऐवजी तिच्या आयुष्यातल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. वाणीला एक बहीण आहे. नुपूर हे तिचे नाव. नुपूरशी तिचे घट्ट बॉंडिंग आहे.
 

wani _1  H x W: 
 
मात्र आम्ही खूप भांडायचो असेही ती सांगते. जेव्हा नुपूर घरात नसायची तेव्हा मी आणि माझ्या मैत्रिणी आम्ही स्वत:ला नुपूरच्या खोलीत बंद करून घ्यायचो. तिचे कपडे आणि इतर वस्तूंवर डल्ला मारायचो आणि बियॉन्सीच्या गाण्यांवर धमाल करायचो. जेव्हा नुपूर परत यायची आणि हे सगळे तिला समजायचे तेव्हा साहजिकच ती चिडायची आणि मग आमची भांडणे व्हायची. तीही साधी नसायची. परस्परांवर ओरडण्यापासून चपला फेकण्यापर्यंत सगळे काही त्यात व्हायचे अशा आठवणी तिने शेअर केल्या. मात्र त्या नात्यात एक प्रेम होते व आहे. घट्ट बॉंडिंगही आहे. त्या भांडणाची मजाच काही और होती असे ती म्हणते.