गोरगरिबांना शैलेश सावजींचा मदतीचा हात

    दिनांक :04-May-2021
|
मेहकर, 
टाळेबंदीमध्ये अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे. या नागरिकांना बुलडाणा जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी मदतीचा हात पुढे करत डोणगांव व मेहकर येथे पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या अनिवासी कुटूंबांना धान्य आणि किराणा किटचे वाटप केले आहे. जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी मदतीचा हात पुढे करत डोणगांव व मेहकर शहरातील कुटूंबांना धान्य आणि किराणा साहित्य वाटप करत समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. हाच आदर्श सर्वांनी घेवून गोर-गरीब नागरीकांना मदत करावी आसा संदेश देखील या निमित्ताने दिला गेला आहे.
 
 
bul _1  H x W:
 
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संजय राठोड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्याम उमाळकर, एन.एस.यू.आय.चे जिल्हा अध्यक्ष शैलेश खेडकर, प्रमोद जाधव, श्याम इंगळे, चरण आखाडे, सचिन साखळकर, विष्णू पळसकर, गणेश इंगळे, प्रभाकर इंगळे, संतोष जाधव, अजय मोरे यांच्या हस्ते मेहकर येथील कुंजविहार व जानेफळ रस्त्यालगत पालात राहणार्‍या कुटुंबाना तसेच डोणगाव येथील पातुरकर विद्यालय, विठ्ठल रुखमाई विद्यालय समोरील तसेच जवळा रस्त्यावर असणार्या कुटुंबाना धान्य व किराणा साहीत्य वाटप केले. त्यामुळे टाळेबंदीमध्ये कुटुंबाचे पालन पोषण करण्याचा प्रश्न या बाहेर गाववरून आलेल्या कुटुंबासमोर उभा असताना शैलेश सावजी यांनी दिलेल्या मदतीने या कुटुंबांच्या चेहर्‍यावर हसू फुलले.