विजय देवराकोंडाचे वेगळेपण

    दिनांक :04-May-2021
|
मुंबई,
कलाकार मोठा झाला की ऍटिट्यूड असतो. ज्या चाहत्यांच्या जिवावर आणि पैशावर ते मोठे झालेले असतात त्यांना ते कस्पटासमान लेखतात. हिंदी चित्रपटांतील अनेक स्टार मंडळींकडे पाहिले की याची प्रचिती येते. मात्र तेच तुम्ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे वळलात तर तेथील चाहते आणि कलाकार यांचे वेगळेपण…माणूसपण चटकन डोळ्यात भरते.तेथील चाहते आपल्या लाडक्‍या कलाकारांची मंदिरे बांधतात. त्यांच्या पोस्टरलाही दुग्धाभिषेक करतात, तर कलाकारी अडचणीच्या काळात बांधिलकी जपत आपल्या चाहत्यांना मदतीला सज्ज असतात. विजय देवराकोंडा हा ताज्या दमाचा कलाकारही त्यापैकीच एक.
 
 
vijay _1  H x W
 
विजय गेल्या काही काळात मोठा स्टार झाला आहे. त्याच्या अर्जुन रेड्डीचा रिमेक हिंदीतही तुफान चालला. विजयच्या अन्य चित्रपटांनीही बॉक्‍स ऑफिसवर धमाल केली. केवळ साउथमध्येच नाही तर हिंदी बेल्टमध्ये त्याचे असंख्य चाहते निर्माण झाले आहे. असाच एक चाहता प्रचंड आजारी असून, त्याने विजयकडून एक टी शर्ट मिळावा अशी अपेक्षा केली व त्याच्याशी बोलण्याची इच्छाही व्यक्‍त केली. वास्तविक टी शर्ट फार मोठी बाब नव्हती. मात्र प्रसिद्धी आणि पैशाची पट्टी डोळ्यावर बांधली गेली की अशा इच्छा आणि अपेक्षांची पत्रास नसते. विजयला मात्र हे समजल्यावर त्याने टी शर्ट तर दिलाच मात्र आपल्या या चाहत्याशी संवादही साधला.