'बदलापूर' ठरला टर्निंग पॉइंट

    दिनांक :10-Jun-2021
|
मुंबई,
'बदलापूर' हा आपल्या करिअरमधील सर्वातोपरी महत्त्वाचा सिनेमा होता, असे राधिका आपटेने म्हटले आहे. तिच्याविषयी प्रेक्षकांचा समज बदलण्यात या चत्रपटाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, असे तिला वाटते.'बदलापूर' हा सिनेमा आपल्याला अगदी वेळेवर मिळाला. कारण त्यामध्ये बराच मालमसाला होता. या सिनेमाची निवडदेखील योग्यप्रकारे झाली होती. याशिवाय हा सिनेमा सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी होता. त्यामुळे प्रेक्षकांनी तो वेगळ्या नजरेतून बघितला.
 
radhika _1  H x
 
राधिका आपटेने बॉलीवूडबरोबरच हॉलीवूडमध्येही जम बसवला आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. तिच्याकडे जाहिरात क्षेत्रातील काही प्रसिद्ध ब्रॅन्डही आहेत. पण तिची गणना अभिनेत्रींमध्ये व्हावी, यासाठी 'बदलापूर'सारखा सिनेमाच कारणीभूत ठरला हे नाकारून चालणार नाही. काही महिन्यांपूर्वी राधिका मालदीवला फिरायला गेली होती. तेथील फोटो तिने सोशल मीडियावर पोस्टदेखील केले होते. त्या फोटोंची चर्चा अजूनही होते आहे. अचानक तिला 'बदलापूर'ची आठवण का व्हावी हे मात्र समजू शकलेले नाही.