आमिरचा नवीन लूक

    दिनांक :10-Jun-2021
|
मुंबई, 
मिस्टर परफेक्‍शनिस्ट आमिर खान नेहमीच अगदी हटके, काहीतरी वेगळे करत असतो. त्याची प्रत्येक गोष्ट वेगळी असते. त्याने आपल्या लुकबाबत नेहमीच काहीतरी प्रयोग केलेले आहेत.त्याच्या आगामी सिनेमातील रोलच्या अनुषंगाने त्याने आपल्या लूकमध्ये सारखे बदल केले आहेत. अलीकडे त्याने असाच लूक बदलला आहे. एका डबिंग स्टुडिओच्याबाहेर त्याला बघितले गेले तेव्हा त्याला ओळखणेही अवघड गेले होते.
 
amir _1  H x W:
त्याचा एक व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. यामध्ये त्याचे केस अगदी बारीक कापलेले दिसत आहेत. चेहऱ्यावर मास्क लावलेला असल्याने लूकमधील बदल दिसला नाही. पण त्याने लांब दाढी वाढवलेली दिसते आहे. कारण त्याची दाढी मास्कच्याही बाहेर आलेली दिसते आहे. त्याचा हा लूक त्याने अर्थातच 'लालसिंग चढ्ढा'च्या रोलसाठी केलेला असणार हे उघड आहे. कारण त्यामध्ये तो एका सरदारजीच्या रोलमध्ये दिसणार आहे. 'लालसिंग …'मध्ये त्याच्या बरोबर करिना कपूर देखील लीड रोलमध्ये दिसणार आहे. हॉलीवूडमधील गाजलेल्या 'फॉरेस्ट गम्प'चा हा ऑफिशियल हिंदी रिमेक असणार आहे.