मुलांच्या उपचाराची गाईडलाईन जारी...रेमडिसिविरचा वापर नकोच

    दिनांक :10-Jun-2021
|
कोरोनाची (Coronavirus) तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता व्यक्ती केली जात आहे. यामुळे सरकारने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मुलांच्या उपचारासंबंधी गाईडलाईन जारी केली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून मुलांमध्ये रेमडिसिविर इंजेक्शनचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. गाईडलाईनमध्ये म्हटले आहे की, उपचारादरम्यान स्टेरॉईडच्या वापरावर लक्ष देणे अतिशय आवश्यक आहे. याचा वापर योग्यवेळी आणि योग्य प्रमाणात अतिशय आवश्क आहे. तसचे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्टेरॉईडचा वापर अजिबात करू नये.
 
chil_1  H x W:
 
विचारपूर्वक व्हावा सिटी स्कॅनचा वापर
याशिवाय स्कॅनचा वापर सुद्धा योग्य पद्धतीने करण्याचा सल्ला दिला आहे. गाईडलाईनमध्ये म्हटले आहे की, डॉक्टरांनी मुलांचे सिटी स्कॅन करताना अतिशय संवेदनशीलता बाळगली पाहिजे. तर रेमडिसिविर इंजेक्शनबाबत म्हटले आहे की, एफिकेसी डेटाच्या कमतरतेमुळे मुलांमध्ये याचा वापर केला नाही पाहिजे.
  
chil_1  H x W:
 
तज्ज्ञांनी जाहिर केली आहे शक्यता
तज्ज्ञांनी शक्यता वर्तवली आहे की कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक ठरू शकते.
तज्ज्ञांनुसार देशात कोरोनाची पहिली लाट ज्येष्ठांसाठी धोकादायक बनली होती,
तर दुसरी लाट तरूणांच्या लोकसंख्येसाठी धोकादायक ठरली होती.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी जीवघेणी ठरू शकते.
व्हॅक्सीन ट्रायलची दिली आहे परवानगी
याचा कारणामुळे मुलांच्या व्हॅक्सीनेशनबाबत सुद्धा प्रयत्न केले जात आहे.
भारताची स्वदेशी व्हॅक्सीन कोव्हॅक्सीनची निर्मिती करणारी कंपनी भारत बायोटेकला मुलांमध्ये ट्रायलची परवानगी दिली आहे.
भारत बायोटेककडून ही ट्रायल 525 व्हॉलिटियर्सवर केली जाईल.
या ट्रायलमध्ये 2 ते 18 वर्षांच्या मुलांचा समावेश करण्यात येईल.