सिलेंडरसाठी ग्राहकांना निवडता येणार पसंतीचा वितरक

    दिनांक :10-Jun-2021
|
नवी दिल्ली,
घरगुती गॅस ग्राहकाला आता सिलेंडरसाठी पसंतीचा वितरक निवडता येणार आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ही योजना सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर चंदीगढ, कोईम्बतूर, गुडगाव, पुणे आणि रांची या शहरांत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना यशस्वी झाल्यास देशभरात ही सेवा सुरू होणार असल्याचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.
 
  
cylinder 1_1  H
 
अनेकदा घर बदलल्यामुळे किंवा भाड्याचे घर सोडून दुसर्‍या ठिकाणी वास्तव्यास गेल्याने वितरकाच्या कार्यालयापर्यंत जाण्यास बराच वेळ जातो. त्याच्याकडून सिलेंडर जमा करून दुसर्‍या वितरकाकडे नोंदणीसाठी पुन्हा काही रक्कम भरावी लागते. यात ग्राहकाचे मोठे नुकसान होत असल्याने त्यांना घराच्या जवळपास किंवा हव्या असलेल्या वितरकाकडे सिलेंडर मिळावे, यासाठी ही सेवा सुरू केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यातील प्रयोगाच्या निष्कर्षांनंतर व्यापकस्तरावर देशभरात योजनेची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती पेट्रोलियम मंत्रालयाने दिली.