राज्यात एनडीआरएफच्या 15 तुकड्या तैनात

    दिनांक :10-Jun-2021
|
मुंबई, 
शुक्रवारपासून पाच दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये विशेषत: मुंबई आणि कोकणात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला असल्याने, आप्तकालीन स्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय आपात प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) 15 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. एनडीआरएफचे संचालक एस. एन. प्रधान यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली.
 
  
ndrf_1  H x W:
 
एनडीआरएफच्या चार तुकड्या रत्नागिरीत आणि प्रत्येकी दोन तुकड्या मुंबई, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड आणि ठाण्यात तर एक तुकडी कुर्ला उपनगरात तैनात करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या विशेष विनंतीवरून आम्ही ही तैनाती केली आहे. हवामान खात्याने या सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार आणि अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन आम्ही स्वत:ला सज्ज ठेवले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.