डिंगको सिंह क्रीडाक्षेत्रातील तारा होते : मोदी

    दिनांक :10-Jun-2021
|
नवी दिल्ली, 
आशियाड सुवर्णपदक विजेते बॉक्सर डिंगको सिंह हे बॉक्सिंग क्षेत्रातील चमकता तारा होते. भारतात बॉक्सिंग क्रीडा प्रकाराला लोकप्रिय करण्यात त्यांनी भरीव योगदान दिले. त्यांच्या अचनाक निधनाने दुःख झाले. त्यांचे कुटुंब व चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिंगको सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
 
 
modi dingco_1  
 
बॉक्सिंगचे फार मोठे नुकसान : रिजिजू
डिंगको सिंह यांच्या निधनामुळे मला अतिशय दुःख होत आहे. 1998 मध्ये बँकॉक एशियन गेम्समध्ये दिंकोने सुवर्णपदकाची कमाई केली होती. ते भारतातील सर्वोत्तम बॉक्सरपैकी एक होते. त्यांनीच भारतात बॉक्सिंग साखळीची सुरुवात केली. त्यांच्या निधनाने भारतीय बॉक्सिंग क्षेत्राचे फार मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दात केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. दहा वर्षांचा असताना डिंगको सिंह यांनी सबज्युनियरर गटाचे राष्ट्रीय विजेतेपद पटकावणारा मणिपुरी सुपरस्टार आशियाडमधील सुवर्णपदकासह आधुनिक भारतीय बॉक्सिंग क्षेत्रातील पहिल्या तार्‍यांपैकी एक होता. त्यांनी सहा वेळची विश्वविजेती एम.सी. मेरी कोमसार‘या खेळाडूला प्रेरणा दिली, असेही ते म्हणाले.
 
 
डिंगको सिंह यांच्या निधनाने भारतीय बॉक्सिंगचे फार मोठे नुकसान झाले आहे. ते पुढील पिढीतील बॉक्सर्ससाठी प्रेरणास्थान होते आणि त्यांचा वारसा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील, अशी प्रतिकि‘या भारतीय बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष अजय सिंह यांनी व्यक्त केली. या दु:खाच्या क्षणी बॉक्सिंग कुटुंब पत्नी व कुटुंबीयांशी एकजुटीने उभे आहे. दिवंगताच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना करतो, असे ते म्हणाले.
एक महान बॉक्सर गमावला : मेरी कोम
डिंगको सिंह हे एक रॉकस्टार, एक महान बॉक्सर होते. मला आठवतेय की मी मणिपूरमध्ये त्यांचा बॉक्सिंग सामना बघण्यासाठी रांगा लावायचो. त्यांनीच मला प्रेरणा दिली. ते माझा नायक होते. आयुष्य हे खूपच अनाकलनीय आहे. ते फार लवकर आपल्यातून निघून गेले, अशी प्रतिकि‘या मेरी कोमने व्यक्त केली. निर्भय प्रतिस्पर्धी असलेल्या डिंगको यांनी भारतीय बॉक्सर म्हणून बँकॉकमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकताना थायलंडच्या सोनताया वोंगप्रेट्स व उझबेकिस्तानच्या तैमूर तुल्याकोव्ह या दोन ऑलिम्पिकपदक विजेत्या बॉक्सर्सला नमवून सुवर्णपदक पटकावण्याची उल्लेखनीय कामगिरी केली. ऑलिम्पिकमध्ये भारताला बॉक्सिंगचे पहिले पदक जिंकून देणारा बॉक्सर विजेंद्र सिंह व 1998 मधील आशियाड संघाचे प्रभारी व माजी राष्ट्रीय प्रशिक्षक गुरबक्षसिंग संधू यांनीसुद्धा डिंगको सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. डिंगको सिंह यांच्या आयुष्याचा प्रवास आणि संघर्ष भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणास्त्रोत ठरले, असे ते म्हणाले. आम्ही एक महान बॉक्सर गमावला, अशी प्रतिक्रिया टोकियो ऑलिम्पिक पात्र बॉक्सर विकास कृष्ण याने व्यक्त केली.