होरपळलेल्या कुटुंबीयांना मिळाली मदत!

    दिनांक :10-Jun-2021
|
- सलील देशमुख यांनी घेतला पुढाकार
नागपूर, 
चीनने लादलेली कोरोनारूपी महामारी आणि नैसर्गिक संकट यामुळे भारतातील जनजीवन मेटाकुटीला आले आहे. अशातच नागपूर जिल्ह्यात येणार्‍या काटोल तालुक्यातील डोरली भिंगारे गावात आग लागली. परिणामी बुधवार 9 जून 2021 रोजी तीन घरे जळून खाक झाली. यासर्व होरपळलेल्या कुटुंबीयांची दखल घेत जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी डोरली भिंगारे गावात प्रत्यक्ष जाऊन पीडितांना आर्थिक मदत केली.

ngp_1  H x W: 0 
 
विठाबाई लक्ष्मण टुले, राधा पुरुषोत्तम टुले, नारायण नामदेव सरोदे अशी पीडित कुटुंबीयांची नावे आहेत. बुधवारला या तिन्ही लोकांच्या घराला अचानक आग लागली. परिणामी आगीत संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या गाड्यांनी घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान गुरुवार 10 जून 2021 रोजी सलील देशमुख हे स्वत: डोरली भिंगारे गावात गेले. तिथे त्यांनी आग नेमकी कशी लागली, काय नुकसान झाले याची माहिती जाणून घेतली. पीडित कुटुंबीयांना आधार देत तुम्ही घाबरू नका, आम्ही आपल्या सोबत आहोत अशी ग्वाही दिली. याचवेळी जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी स्वत:कडून तिन्ही कुटुंबीयांना आर्थिक मदत केली. यावेळी चंद्रशेखर चिखले, निशिकांत नागमोते, सरपंच राकेश हेलोंडे, जयंत टालाटुले, संजय डांगोरे, सुरेश जिवतोडे, मनोहर भिंगारे, सुभाष भिंगारे उपस्थित होते. पीडित कुटुंबीयांना ग्रामपंचायतच्या वतीनेही आर्थिक मदत, अन्न धान्य देण्यात आले आहे.