लसींच्या नासाडीत झारखंड आघाडीवर

    दिनांक :10-Jun-2021
|
- केरळ, पश्चिम बंगालमध्ये सर्वांत कमी
 
नवी दिल्ली, 
लसींच्या नासाडीत झारखंड आघाडीवर असून, या राज्यात 33.95 टक्के लसींची नासाडी झाली आहे. केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये मे महिन्यात लसींची सर्वांत कमी नासाडी झाली. या राज्यांनी अनुक्रमे 1.10 लाख आणि 1.61 लाख मात्रा नासाडी होण्यापासून वाचवल्या, असे सरकारच्या माहितीतून स्पष्ट झाले आहे.
 
 
las 3_1  H x W:
 
केरळमध्ये उणे 6.37 टक्के, तर पश्चिम बंगालमध्ये उणे 5.48 टक्के मात्रांची नासाडी झाली. छत्तीसगडमध्ये 15.79 टक्के, तर मध्यप्रदेशात 7.35 टक्के मात्रा वाया गेल्या आहेत. पंजाब, दिल्ली, राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात अनुक‘मे 7.8, 3.95, 3.91, 3.78, 3.63 आणि 3.59 टक्के मात्रा वाया गेल्या आहेत.
 
 
केंद्र सरकारने मे महिन्यात एकूण 790.6 लाख मात्रांचा पुरवठा राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना केला. त्यापैकी 610.6 लाख लसीकरण करण्यात आले, तर 658.6 लाख शॉट्स वापरण्यात आले आणि 212.7 लाख मात्रा शिल्लक होत्या. एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात लसीकरणाचा वेग मंदावल्याचेही स्पष्ट झाले आहे. या महिन्यात 878.7 लाख जणांचे लसीकरण करण्यात आले. यासाठी 902.2 लाख मात्रा वापरण्यात आल्या असून, 80.8 लाख मात्रा शिल्लक असल्याचे केंद्राने जारी केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट केले.