लसीच्या दोन मात्रा घेतल्यावर शरीरात चुंबकत्व

    दिनांक :10-Jun-2021
|
- आरोग्य विभागाने केली तपासणी
 नाशिक, 
कोरोना लसीच्या दोन मात्रा घेतल्यानंतर येथे एका ज्येष्ठ नागरिकाच्या शरीरात चुंबकत्व निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. नाशिकच्या सिडको भागातला हा प्रकार आहे. कोव्हिशिल्ड लसीच्या दोन मात्रा घेतल्यावर अरविंद सोनार यांच्या शरीराला अचानक सर्व वस्तू चिकटायला लागल्या. याबाबतची माहिती समाजमाध्यमांवर येताच, आरोग्य पथकाने आज गुरुवारी तपासणी केली. अहवाल आल्यानंतरच यामागील वस्तुस्थिती स्पष्ट होईल.
 
 
m_1  H x W: 0 x
 
सिडको परिसरात शिवाजी चौकात राहणारे अरविंद जगन्नाथ सोनार यांच्या शरीरावर धातूच्या वस्तू थेट चिटकत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याची चित्रफीत समाजमाध्यमावर फिरत आहे. दोन दिवसांपूर्वी कोरोना लसीची दुसरी मात्रा त्यांनी एका खाजगी रुग्णालयात घेतली होती. लस घेतल्यावर शरीरात चुंबकत्व निर्माण होत असल्याचा संदेश समाजमाध्यमांत फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी स्वतः प्रयत्न करून बघितला. लोखंडाच्या आणि स्टीलच्या वस्तू, नाणे चमचे शरीरावर चिकटून राहात असल्याचे लक्षात आले. याबाबत माहिती विचारली असता तपासणी करूनच प्रतिक्रिया देऊ, असे जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितल्याचे वृत्त एका मराठी वाहिनीने दिले आहे.
 
 
डॉ. राजेश टोपेंनी दिला चौकशीचा आदेश
याप्रकाराबाबत आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. लस घेतल्यावर चुंबकीय ऊर्जा निर्माण झाली असेल, तर तो दावा ग्राह्य धरू शकत नाही, असे नाशिकचे सिव्हिल सर्जन डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले. पण, वैद्यकीय चाचण्या करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. राजेश टोपे म्हणाले, यामागे नक्की काय कारण आहे, ते तपासले जाईल. वैद्यकीय कारण काय आहे, हे तपासले जाईल.