म्यानमार लष्कराचे विमान कोसळले, 12 मृत्युमुखी

    दिनांक :10-Jun-2021
|
-मृतांमध्ये अधिकार्‍यांचा समावेश
  
यंगून, 
म्यानमार लष्कराचे विमान मंडाले भागात दुर्घटनाग‘स्त झाले असून, यात 12 जण मृत्युमुखी पडले असल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांमध्ये लष्करी अधिकार्‍यांचाही समावेश असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.
 
 
Myanmar_1  H x
 
राज्य प्रशासन परिषदेच्या माहिती विभागाचे मेजर जनरल जॉ मिन टुन यांनी सांगितले की, लष्कराचे विमान पाय ताव येथून पायिन ऊ ल्विन शहराच्या दिशेने उडत होते. आज सकाळी 8 वाजता मंडाले क्षेत्रातील वीजनिर्मिती केंद्र आणि पोलाद कारखान्यादरम्यान ते कोसळले. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला. परंतु, अन्य चार जणांबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. यावेळी विमानात एकूण 16 लोक प्रवास करीत होते. यात लष्करी अधिकार्‍यांचाही समावेश होता. विमानाच्या अपघाताबाबत कोणतीही माहिती मिळाली नसून, लष्कराचे चौकशी पथक चौकशी करत आहेत.