सॅलिसबेरी-क्रावझिकला मिश्र दुहेरीचे विजेतेपद

    दिनांक :10-Jun-2021
|
पॅरिस, 
जो सॅलिसबेरीने ब्रिटनची 39 वर्षांची फ्रेंच ओपन विजेतेपदाची प्रतीक्षा संपविली. सॅलिसबेरीने अमेरिकेच्या डिजायरे क्रावझिकच्या मदतीने रोलॅण्ड गॅरोसवर फ्रेंच ओपन मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
 
 
DESIRAE-SALISBURY.jpg_1&n
 
क्रावझिक व सॅलिसबेरीने मिश्र दुहेरीच्या अंतिम साम्यात रशियाच्या एलिना व्हेसनिना-अस्लन कॅरात्सेव्हवर 2-6, 6-4 (10-5) अशी मात करून मिश्र दुहेरीच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. 1982 मध्ये जॉन लॉयड व ऑस्ट्रेलियाच्या वेंडी टर्नबुलच्या मदतीने ब्रिटनने पहिल्यांदा मिश्र दुहेरीचे ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपद पटकावले होते.