अमृताबरोबर दिसणार सारा

    दिनांक :10-Jun-2021
|
मुंबई,
सारा अली खानने 'केदारनाथ'मधून पदार्पण केले तेव्हापासून तिचे फॅन तिला वडील सैफ अली खान आणि आई अमृता सिंगबरोबर पाहण्यासाठी आतूर आहेत. त्यांची ही अपेक्षा आता लवकरच पूर्ण होईल असे वाटते आहे. सारा लवकरच आई अमृता सिंगबरोबर एका पडद्यावर दिसणार आहे. ही कोणतीही फिल्म नसेल तर एक ऍडव्हर्टाइजमेंट असणार आहे. साराने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये ती आई अमृता सिंगबरोबर दिसते आहे. हा फोटो त्याच ऍडच्या शूटिंगवेळचा आहे.

sara _1  H x W: 
 
एका इंटरव्ह्यू दरम्यान साराने आपल्या आईबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्‍त केली होती. अमृता सिंगने आता सिनेमातून काम करणे थांबवले आहे. त्यामुळे तिच्याबरोबर काम करता येईल की नाही याबद्दल साराला शंका आहे. याशिवाय आणखी एक कारण म्हणजे साराबरोबर काम करण्याचा अनुभव अमृता सिंगसाठी फारसा काही चांगला असणार नाही याची स्वतः साराला खात्री वाटते आहे. मात्र, वडील सैफ अली खानबरोबर काम करण्याची तिला अजूनही आशा वाटते आहे. सारा लवकरच 'अतरंगी रे'मध्ये अक्षयकुमार आणि धनुषबरोबर दिसणार आहे.