धक्कादायक...देशात कोरोनाच्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद

    दिनांक :10-Jun-2021
|
- बाधितांच्या संख्येतही वाढ
नवी दिल्ली,
देशात गेल्या काही दिवसांपासून नव्या रुग्णांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण कमी होत आहे. मात्र अशी परिस्थिती असूनही चिंता कायम आहे. याचे कारण म्हणजे गेल्या 24 तासांत आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. हा आकाडा आतापर्यंतचा सर्वात जास्त आहे. गेल्या 24 तासातील आकडेवारी धक्कादायक आहे. भारतात गेल्या 24 तासांत मृत्यूदराने आतापर्यंतचा रेकॉर्ड तोडला आहे. 94 हजार नवीन लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर 6148 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार 24 तासांत 94 हजार 52 लोकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आतापर्यंत सर्वात जास्त गेल्या 24 तासातली आहे.
  
corona _1  H x
बाधितांच्या संख्येतही वाढ
देशातल्या दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येतही वाढ झालेली दिसून येत आहे. काल दिवसभरात देशात ९४ हजार ५२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे सध्या उपचाराधीन असलेल्या कोरोनारुग्णांचा आकडा आता ११ लाख ६७ हजार ९५२ वर पोहोचला आहे. तर काल दिवसभरात देशातले एक लाख ५१ हजार ३६७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. देशात काल दिवसभरात ३३ लाख ७९ हजार २६१ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. त्यापैकी ३० लाख ६५ हजार ९५१ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, तीन लाख १३ हजार ३१० नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. त्यामुळे लस घेतलेल्या एकूण नागरिकांची संख्या आता २४ कोटी २७ लाख २६ हजार ६९३ वर पोहोचली आहे.