राज्यातील सरकार पाच वर्षे टिकेल- शरद पवार

    दिनांक :10-Jun-2021
|
मुंबई,
महाविकास आघाडीतील सरकार पाच वर्षे टिकेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ठणकावलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येईल, असे लोकांना कधीच वाटले नव्हते. पण आपण एकत्र आलो. पर्याय दिला. लोकांनी हा पर्याय स्वीकारला असून आपली यशस्वी वाटचाल सुरू झाली आहे. कुणी काही म्हणो, सरकारची वाटचाल दमदार सुरू आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

sharad _1  H x
 
राष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही
ज्याप्रमाणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनंतर शिवसेनेचे काय होईल अशा प्रश्न विचारला जात होता, त्याचप्रमाणे शरद पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे काय भविष्य असेल, असे प्रश्न कार्यकर्ते विचारत असतात, त्यांच्या या प्रश्नाला आता खुद्द शरद पवारांनी उत्तर दिलं आहे. नवीन नेतृत्व तयार झाले आहे, राष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही, असे पवारांनी म्हटले आहे.
 
 
शिवसेना विश्वासहार्य पक्ष
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकांतात भेट झाली. त्यावर अनेकांनी तर्कवितर्क लढवले होतो. त्यावेळी अनेकांनी शंकाकुशंका घेतल्या. या शंका घेणारे वेगळ्या नंदनवनात राहत आहे. शिवसेना हा सर्वात विश्वासहार्य पक्ष आहे, असे पवार म्हणाले आहेत. दरम्यान, आपण महाराष्ट्रातील लोकांना महाविकास आघाडीचा पर्याय दिला, त्यावर विश्वास ठेऊन लोकांनी तो पर्याय स्वीकारला. आजच्या घडीला महाविकास आघाडी सरकार उत्तमरित्या काम करत असल्याचंही शरद पवार म्हणाले आहेत. कोरोना काळात राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे यांनी केलेल्या कामाची स्तुती शरद पवार यांनी केली.