शेअर बाजाराची 359 अंकांची कमाई

    दिनांक :10-Jun-2021
|
मुंबई : देशातील कोरोनाबाधितांची बरे होण्याची संख्या आणि जागतिक शेअर बाजारातील सकारात्मक स्थिती याचे चांगले परिणाम आज गुरुवारी मुंबई शेअर बाजारात दिसून आले.
 
 
sensex5_1  H x
 
गुंतवणूकदारांनी खरेदीवर भर दिल्याने, शेअर बाजाराने 359 अंकांची कमाई केली. दिवसभराच्या व्यवहारानंतर शेअर बाजाराचा निर्देशांक पुन्हा एकदा 52 हजारांच्या वर जात 52.300.47 या स्तरावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही 102.40 कमाई केली. दिवसभराच्या व्यवहारानंतर निफ्टी 15,737.75 या स्तरावर बंद झाला. आजच्या व्यवहारात बजाज फायनान्स, भारतीय स्टेट बँक, इंडसइंड बँक, डॉ. रेड्डीज, आयटीसी, कोटक बँकेला फायदा झाला, तर मारुती, एचसीएल, अल्ट्राटेक सिमेंट आणि पॉवरग्रीडला नुकसान सहन करावे लागले.