दहा दिग्गज क्रिकेटपटूंना आयसीसी हॉल ऑफ फेम

    दिनांक :10-Jun-2021
|
दुबई, 
जागतिक कसोटी अजिंक्यपद कसोटी अंतिम सामन्याच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद पाच कालखंडातील 10 दिग्गज क्रिकेटपटूंना प्रतिष्ठेच्या ‘आयसीसी हॉल ऑफ फेम’ने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रत्येक कालखंडातील प्रत्येक दोन दिग्गजांचा आता जगातील 93 महान क्रिकेटपटूंच्या विद्यमान यादीत समावेश होईल.
 
 
ICC-HALL-OFFAME.jpg_1&nbs
 
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 जूनपासून साऊदम्प्टन येथे होणार्‍या पहिल्या कसोटी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या पृष्ठभूमीवर आयसीसीने गुरुवारी विशेष आयसीसी हॉल ऑफ फेमची घोषणा केली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या या खेळातील 10 दिग्गज कि‘केटपटूंच्या समावेशामुळे आता हॉल ऑफ फेमच्या मानकर्‍यांची सं‘या 103 होईल.पहिल्या आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याचा सुवर्णयोग साधून आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये दहा क्रिकेटपटूंचा एकाच वेळी समावेश करणे, हा आमचा सन्मान आहे, असे आयसीसीचे कार्यकारी मु‘य कार्यकारी जोफ अलार्डिस यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. .
 
 
आम्ही खेळाचा इतिहास साजरा करीत आहोत आणि वेगवेगळ्या युगांमध्ये आपले स्थान निर्माण करणार्‍या महान क्रिकेटटपटूंचा गौरव करण्यापेक्षा आणखी काय चांगले असू शकते. हे सर्व असे वारसा आहेत, जे येणार्‍या पिढ्यांना पुढील अनेक वर्षे प्रेरणा देत राहतील, असेही ते म्हणाले. आयसीसीने पाच कालखंडातून प्रत्येकी दोन दिग्गजांची या सन्मानासाठी निवड केली असून हे पाच कालखंड असे आहेत- अगदी सुरुवातीचे क्रिकेट युग (1918 पूर्वीचा), आंतर-युद्ध कि‘केट युग (1918-1945), युद्धानंतरचे क्रिकेट युग (1946-1970), वन-डे युग (1971-1995), आधुनिक कि‘केट युग (1996-2016).
 
 
या दहा दिग्गज कि‘केटपटूंची निवड आयसीसी हॉल ऑफ फेम अकादमीतर्फे मतदानाव्दारे करण्यात आली. यात हॉल ऑफ फेमचे सदस्य, एफआयसीएचे (फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल कि‘केटर असोसिएशन) प्रतिनिधी, प्रख्यात क्रिकेट पत्रकार आणि आयसीसीचे वरिष्ठ नेत्यांनी मतदान केले. निवडलेल्या दहा दिग्गजांची घोषणा आयसीसीच्या डिजीटल मीडिया वाहिनीव्दारे करण्यात येणार आहे.