अमेरिका गरीब देशांना देणार फायझरच्या 50 कोटी मात्रा!

    दिनांक :10-Jun-2021
|
वॉशिंग्टन, 
अमेरिका कोव्हॅक्सच्या माध्यमातून कमी उत्पन्न गटातील 92 देशांसह आफ्रिकन महासंघाला फायझरची कोरोना लस देणार आहे. पुढील वर्षी अमेरिका 50 कोटी मात्रा खरेदी करणार असल्याची माहिती सूत्राने दिली.
 
 
pfizer 1_1  H x
 
राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन हे जी-7 राष्ट्रसमूहाची बैठक सुरू होण्याआधी एका भाषणातून या निर्णयाची घोषणा करणार आहेत. लसीच्या 20 कोटी मात्रा यावर्षी देण्यात येणार आहेत. उर्वरित मात्रा 2022 च्या पहिल्या सहा महिन्यांत देण्यात येणार आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलीवन यांनी म्हटले आहे की, लस पुरवठा करण्यासाठी बायडेन प्रशासन कटिबद्ध आहे. याआधी व्हाईट हाऊसने जून महिन्याच्या अखेरपर्यंत जगभरात आठ कोटी मात्रा वितरित करण्याची घोषणा केली होती. यातील बहुतांशी मात्रांचे वितरण कोव्हॅक्सच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.