येस बँकच्या एफडी दरात बदल

    दिनांक :10-Jun-2021
|
मुंबई,
येस बँकने आपल्या एफडीच्या दरात बदल केला आहे. 3 जूनपासून हे नवे दर लागू केले जाणार आहे. नव्या दरांप्रमाणे बँक 7 दिवस ते 14 दिवसांच्या एफडीवर 3.5 टक्के व्याज देणार आहे. तसेच 15 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 4 टक्के व्याज देत आहे.
 
yes_1  H x W: 0
 
त्याचप्रमाणे 9 महिन्यांपासून ते 1 वर्षाच्या एफडीवर 5.75 टक्के व्याजदर लागू करण्यात आला आहे. तुम्हालाही येस बँक तील मुदत ठेव मध्ये गुंतवणूक करायची असल्यास,  त्यासाठी नवे व्याजदर जाणून घेणे आवश्यक आहे. तसेच सामान्य नागरिकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना 50 बेसिस पॉईंटपेक्षा अधिक व्याज मिळतो. बँक ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीत मुदत ठेवींवर 3.75 टक्के ते 7.25 टक्के व्याज देते.
 
 
एफडी कालावधी - व्याज
- 7 दिवस ते 14 दिवसांपर्यंत - 3.25 टक्के
 
- 15 दिवस ते 45 दिवसांपर्यंत - 3.50 टक्के
 
- 46 दिवस ते 90 दिवसांपर्यंत - 4 टक्के
 
- 3 महिन्यांपेक्षा जास्त पण 6 महिन्यांपेक्षा कमी - 4.50 टक्के
 
- 6 महिने किंवा त्यापेक्षा अधिक पण 9 महिन्यांपेक्षा कमी - 5 टक्के
 
- 9 महिने किंवा त्यापेक्षा अधिक पण 1 वर्षांहून कमी - 5.25 टक्के
 
- 1 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक पण 2 वर्षांहून कमी - 6 टक्के
 
- 2 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक पण 3 वर्षांहून कमी - 6.25 टक्के
 
- 3 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक 10 वर्षांपर्यंत - 6.50 टक्के