राज कुंद्राने तयार ठेवला होता ‘प्लॅन बी’

    दिनांक :21-Jul-2021
|
- आधीच लागली होती संकटाची चाहूल
मुंबई, 
आपल्यावर येणार्‍या संकटाची चाहूल राज कुंद्राला आधीच लागली होती. पुढील काही दिवसांत तपास यंत्रणा आपल्यापर्यंत पोहोचू शकतात, याची माहिती असल्यानेच राज कुंद्राने प्लॅन बी तयार केला होता, अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे. तपासात गुन्हे शाखेच्या हाती लागलेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून राजच्या ‘प्लॅन बी’चा खुलासा झाला आहे. राजचा माजी स्वीय सचिव उमेश कामतच्या मोबाईलची तपासणी करण्यात आली असता त्यातून अनेक असे चॅट्स समोर आले आहेत, जे राजच्या प्लॅन बीचा खुलासा होतो.
 
maha_1  H x W:
 
एच अकाऊंट्स नावाच्या ग्रुपमध्ये प्रदीप बक्षीने हॉटशॉट अ‍ॅप नियमांची पूर्तता न केल्यामुळे गूगलने ते निलंबित केले असल्याची माहिती टाकली होती. त्यानंतर राजने उत्तर दिले की, काहीच हरकत नाही, प्लॅन बी सुरू झाला आहे. जास्तीत जास्त 2 ते 3 आठवड्यांत नवे अ‍ॅप सक्रिय होईल.
 
 
काय आहे प्लॅन बी
राज कुंद्राचा प्लॅन बी म्हणजे, बोलिफेम होय. हा प्लॅन त्यानेच तयार केला होता. पॉर्न उद्योगाला नव्या दिशेने पुढे नेण्यासाठी त्याने हा प्लॅन तयार केला होता. यादरम्यान कामत आणि राज या दोघांमधील आणखी एक चॅट समोर आले, ज्यात राजने कामतला एक न्यूज आर्टिकल पाठविले, यात लिहिले होते की, पॉर्न व्हिडीओ 7 ओटीटीवर प्रसारित केल्यामुळे पोलिस 7 ओटीटी मालकांना समन्स पाठविण्याची शक्यता आहे.
 
राज आणि कामत यांच्यातील चॅट असा
- राज कुंद्रा : खूपच चांगले झाले की, आपण बोलिफेमची तयारी केली.
- उमेश कामत : आपण ऑफिसमध्ये येऊन यावर चर्चा करू. तोपर्यंत आपल्याला सगळे बोल्ड कंटेंट हटवले पाहिजे.
- राज कुंद्रा : मला शंका आहे की, ते लोक ऑल्ट बालाजीचा कंटेंट हटवतील.
- उमेश कामत : हे इतके गंभीर नाही. ते केवळ ओब्जेक्शनेबल कंटेंट काढून टाकण्यासाठी सांगतील.