जगभरात कोरोनानंतर आता 'नोरो व्हायरस'ने घातला धुमाकूळ

    दिनांक :21-Jul-2021
|
लंडन,
संपूर्ण जगभरात मागील दीड वर्षांपासून सर्वत्र कोरोना व्हायरसचा कहर पाहायला मिळत आहे. आता कोरोना व्हायरस  संपुष्टात येत असतांनाच, आणखी एका विषाणूने प्रवेश केला आहे. कोरोना सारखाच विक्राळ असलेल्या  या नवीन 'नोरो व्हायरस' ने आणखीनच  हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे.
 
intre _1  H x W
 
ब्रिटनमध्ये मागील काही दिवसांपासून या विषाणूचे प्रमाण वाढतच चालले आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत कमी लोकसंख्या असलेल्या प्रदेशात नोरो व्हायरसचे 154 रुग्ण आढळले आहेत. या व्हायरसचा वेगाने फैलाव होत असून, सार्वजनिक आरोग्य यंत्रणेला प्रचंड सतर्कता बाळगण्याच्या सूचना देण्यात आली आहे. कोरोना व्हायरसपेक्षा नोरो व्हायरस अधिक धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे.
 
 
नोरो व्हायरसची लागण झाल्यावर तीन दिवसांपर्यंत त्याची लक्षणे दिसतात. तसेच एका महिन्याभरात त्याचे परिणाम शरीरावर दिसून येतात. नोरो व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढू लागल्यानं इंग्लंडमध्ये पुन्हा कडक निर्बंध करण्याची वेळ आली आहे. पोटोचा फ्लू या नावाने देखील 'नोरो व्हायरस' ओळखला जात आहे. दुषित अन्न खाल्यामुळे, उघड्यावरचे प्येय प्यायल्याने, या विषाणूचा संसर्ग होत आहे. विषाणू टाळण्यासाठी कोरोनाशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचे पालन करावे लागणार आहे, असे आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले आहे.