सद्यःस्थितीत प्राथमिक शाळा सुरू करण्याचा विचार योग्य ठरेल

    दिनांक :21-Jul-2021
|
- आयसीएमआरचे मत
नवी दिल्ली, 
मुले विषाणूजन्य संसर्गाचा सामना अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात. त्यामुळे आधी प्राथमिक शाळा पुन्हा सुरू करण्यावर विचार करणे योग्य ठरेल, असे मत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने म्हणजेच आयसीएमआरने व्यक्त केले आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने नुकताच चौथा सीरो सर्वेक्षण केले. त्याचा निष्कर्ष नुकताच जाहीर करताना त्यामध्ये देशभरात 50 टक्क्यांपेक्षा जास्त लहान मुलांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली असून, लहान मुलांना कोरोनाच्या संसर्गाचा धोका कमी असल्यो आयसीएमआरने सांगितले आहे. त्यामुळे देशात पुन्हा सुरवातीला प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय योग्य राहील, असे मत आयसीएमआरचे महसंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी व्यक्त केले आहे.
 
natr_1  H x W:
 
युरोपियन देशांत पहिल्या, दुसर्‍या लाटेतही प्राथमिक शाळा सुरू ठेवल्याचा दाखला देत, प्राथमिक शाळा सुरू करण्यास काहीच हरकत नसल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे. शाळा सुरू करताना त्या ठिकाणच्या सकारात्मक दराचा विचार करणे, सोबतच शिक्षक व इतर शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचा लसीकरण पूर्ण असणे हे सुद्धा आवश्यक असल्याचे आयसीएमआरच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षण विभागाला त्यानुसार नियोजन कराव लागणार आहे.
 
 
आयसीएमआरने पुन्हा एकदा सुरुवातीला प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत मत व्यक्त करीत एकप्रकारे हिरवा कंदील जरी दिला असला, तरी आपल्या राज्यात शिक्षण विभागाला कोरोनाची स्थिती, लसीकरण व इतर सुरक्षिततेच्या बाबींचा काटेकोरपणे विचार करूनच प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत विचार करावा लागेल. त्यानुसार नियोजन शिक्षण विभागाला करावे लागेल व सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावे लागतील.