नेदरलॅण्ड, चिलीचे खेळाडू ऑलिम्पिकच्या बाहेर

    दिनांक :21-Jul-2021
|
- क्रीडाग्राममध्ये कोरोनाची भीती
टोकियो, 
नेदरलॅण्डची स्केटबोर्डर कॅण्डी जेकब व चिलीचा एक तायक्वांडोपटू यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला आहे. त्यामुळे हे दोघेही ऑलिम्पिकच्या बाहेर झाले आहेत. माझ्या चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्यामुळे मी ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊ शकत नाही, परंतु सुदैवाने माझे संघमित्र अजूनही ऑलिम्पिकमध्ये खेळण्यास पात्र आहे. मी निराश झाले, परंतु माझे संघमित्र कोरोना प्रतिबंधात्मक नियमाचे पालन करीत अजूनही ऑलिम्पिकमध्ये चमकण्यास समर्थ आहेत, असे कॅण्डी जेकब म्हणाली.
 
sport_1  H x W:
 
कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्यामुळे चिलीच्या एका खेळाडूने ऑलिम्पिकमधून माघार घेतली आहे, असे चिलीच्या ऑलिम्पिक समितीने म्हटले आहे. टोकियोत आगमन झाल्यानंतर कोरोनामुळे ऑलिम्पिकमधून माघार घेणारा हा पहिला खेळाडू ठरला आहे. टोकियो ऑलिम्पिकशी संंबंधित असलेलया आणखी आठ लोकांचा अहवाल सकारात्मक आला आहे, असे क्योडोच्या वृत्तात म्हटले आहे. ऑलिम्पिकशी संंबंधित असलेल्यांपैकी कोरोनाची बाधा झालेल्यांमध्ये एका खेळाडूचा समावेश असल्याचे बुधवरी आयोजन समितीच्या अधिकार्‍यांनी सांगितले. तत्पूर्वी, सोमवारी टोकियोकडे रवाना होण्यापूवी मेक्सिकोच्या दोन बेसबॉल खेळाडूंच्या चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्याच्या वृत्ताला मेक्सिकोच्या बेसबॉल संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दुजोरा दिला.