बबिताजीचा नवा रेकॉर्ड

    दिनांक :21-Jul-2021
|
मुंबई,
बबिताजी म्हणजेच सोनी सब टीव्हीचा प्रसिद्ध शो तारक मेहता का उल्टा चश्मामधील अभिनेत्री मुनमुन दत्तानं इन्स्टाग्रामवर 5 मिलियन फॉलोअर्ससह एक नवा विक्रम केला आहे.मुनमुनने हा खास प्रसंग हटके पद्धतीनं साजरा केला असून आपल्या चाहत्यांनाही याची झलक दिली आहे. 5 लाख फॉलोअर्ससह नवा विक्रम करणाऱ्या तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतील कलाकार मुनमुन दत्ताचे सर्वाधिक फॉलोअर्स बनले आहेत.

babita _1  H x
 
या मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी यांचे इन्स्टाग्रामवर 1.9 फॉलोअर्स आहेत. मुनमुन तिचे जबरदस्त फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. केवळ इन्स्टाग्रामवरच नाही तर तारक मेहता या मालिकेतील ही सुंदर अभिनेत्री प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप अ‍ॅक्टिव असते.