भवानी, सुशीलादेवींच्या सरावाला सुरुवात

    दिनांक :21-Jul-2021
|
टोकियो, 
कोरोनाच्या सावटाखाली होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये विजयासाठी फेन्सिंगपटू भवानी देवी, ज्युडोपटू सुशीला देवी व जिम्नॅस्ट प्रणती नायक यांच्यासह भारतीय संघाच्या खेळाडूंनी आपल्या सरावाला सुरुवात केली आहे. तिरंदाज दीपिका कुमारी व अतनू दास, टेबल टेनिसपटू जी. साथियन, अचंता शरथ कमल व मनिका बत्रा, बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, बी. साई प्रणित आणि भारताची एकमेव जिम्नॅस्ट प्रणती नायकनेही सोमवारपासून आपला सराव सुरु केला आहे.
 
sport_1  H x W:
 
व्ही. सर्वानन, नेत्रा कुमानन, केसी गणपती व वरुण ठक्कर या नौकानयन संघानेही रविवारपासूनच आपल्या सरावाला सुरुवात केली. हे सर्वजण गत आठवड्यातच टोकियोत दाखल झाले आहेत. 27 वर्षीय भवानी देवी ही महिला आतापर्यंत ऑलिम्पिकच्या फेन्सिंग स्पर्धेसाठी पात्र ठरलेली पहिली भारतीय आहे. भवानी मंगळवारी टोकियोत दाखल झाल्यानंतर ती एक क्षणही वाया न घालविता आपल्या सरावाला सुरुवात केली. बुधवारी भारतीय क्रीडा महासंघाने ती सराव करीत असतानाचे छायाचित्र समाजमाध्यमात सामायिक केलीत व त्याखाली लिहीले की, भारतीय सायबर फेन्सरच्या सरावाच्या काही झलक.
 
 
सुशीला देवी लिक्माबाम सुद्धा टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली पहिली व एकमेव भारतीय ज्युडोपटू आहे. सुशीला देवी इम्फाळ जिल्ह्यातील हेनगँग मायाई लेईकाई येथील रहिवासी आहे. बालपणापासून तिला खेळाची आवड होती. सुशिलादेवीचे काका लिक्माबाम दिनीत हे आंतरराष्ट्रीय ज्युडोपटू असून त्यांनीच तिला डिसेंबर 2002 मद्ये खुमान लाम्पाक येथे घेऊन आले. अगदी युवा अवस्थेपासून सुशीलादेवीने ज्युडोचे धडे गिरवायला सुरुवात केली. तिने साईचे प्रशिक्षक सावित्री चानू यांच्या मार्गदर्शनाखालीसुद्धा ज्युडोचे प्रशिक्षण घेतले आहे. 2014 साली स्कॉटलंडच्या ग्लासगो येथे आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने रौप्यपदक पटकावले होते. 2017 मध्ये सुशीला मणिपूर पोलिसात दाखल झाली.