मुख्यमंत्री हा पालक असतो गाडीचा चालक नाही!

    दिनांक :21-Jul-2021
|
- पडळकरांची गंभीर टीका
सांगली,
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सह कुटुंब स्वत: गाडी चालवतमहापूजेसाठी पंढरपूरला गेले होते. यावरून अनेकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या पंढरपूर दौऱ्यावर टीकास्त्र सोडत मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही असे म्हटले निशाणा साधला आहे.

padalkar_1  H x
काय आहे ट्विटमध्ये?
केंद्र सरकारची प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना महापालिका कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारला फक्त अंमलात आणायची आहे. यासाठी लागणारा निधी हा केंद्राकडूनच आहे. मात्र तरीही सरकारने याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले आहे, असे पडळकर म्हणाले. पाच वेळा उच्च न्यायालयाने तंबी देऊनसुद्धा ही योजना अंमलात आणण्यासाठी ठाकरे सरकार आपल्या जबाबदारीपासून टाळाटाळ करत आहे. सामान्य गरीब जनता मेटाकुटीला आली असताना हे प्रस्थापितांचे सरकार गेंड्याची कातडी पांघरून बसले आहे, अशी बोचरी टीका गोपीचंद पडळकरांनी केली. शिवाय पण यांना खुर्चीचा मोह विठ्ठलाच्या दरबारातही सुटत नाही. याच ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा महापालिका कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतत आहे. जे आपल्या जीवाची पर्वा न करता पालिका कर्मचारी म्हणजे 'कोविड वॉरीयर' यांच्या सुरक्षा हमी अधिकारचे वाटोळे करायला हे ठाकरे सरकार निघालेअसल्याचे ते म्हणाले.