करदात्यांना दिलासा...'हे' दोन फॉर्म भरण्याची मुदत वाढविली

    दिनांक :21-Jul-2021
|
नवी दिल्ली, 
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून (CBDT) फॉर्म 15CA आणि 15CB ची मॅन्युअली भरण्यासाठी अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. हा फॉर्म 15 ऑगस्ट 2021 पर्यंत भरता येऊ शकणार असून, कर भरण्याच्या शेवटच्या तारखेवरून चिंतेत असणाऱ्या करदात्यांसाठी दिलासा देणारी माहिती आहे.
 
natr _1  H x W:
 
प्राप्तिकर विभागाने सुरू केलेल्या पोर्टलमध्ये अडचणी येत असल्याने, आधीची अंतिम तारीख 15 जुलै 2021 पासून, 15 ऑगस्ट 2021 पर्यंत तारीख वाढविण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाचे नवीन पोर्टल 7 जूनपासून सुरू केले होते. त्यानंतर करदात्यांना सातत्याने अडचणींचा सामाना करावा लागत होता. यामुळे विभागाने अंतिम तारीख वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. प्राप्तिकर पोर्टलवर फॉर्म 15CA/15CB हा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फाईल भरणे आवश्यक आहे. फॉर्म 15CA रेमिटरद्वारे असे डिक्लेरेशन होते की, अनिवासींना (नॉन-रेजिडेंटसाठी) पैसे भरल्याप्रकरणी सोर्सवर कर वजा केला गेला आहे. ओव्हरसीज देयकाच्या वेळी प्रासंगिक कर करार आणि आयटी कायद्यातील तरतुदींचे पालन करण्यात आले आहे. हा फॉर्म 15CB हा सीएद्वारे सादर केलेले प्रमाणपत्र आहे.