बॉक्सर लवलिना बोर्गोहेनला शुभेच्छा देण्यासाठी ओरिसात सायकल रॅली

    दिनांक :21-Jul-2021
|
गुवाहाटी, 
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी आसामची एकमेव खेळाडू- बॉक्सर लवलिना बोर्गोहेन हिला शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंंत्री हेमंता बिस्वा सर्मा यांच्या नेतृत्वाखाली सायकल रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत विधानसभा अध्यक्ष बिश्वजीत दायमारी, विरोधी पक्षनेता देबब्रता सायकिया व अनेक आमदारांचा प्रामुख्याने समावेश होता.
 
sport_1  H x W:
 
लवलिना ही आसामची कन्या आहे. शिव थापानंतर ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारी ती आसामची दुसरी खेळाडू आहे. तिला ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यास प्रोत्साहित करण्यासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन ही सात किलोमीटरची सायकल रॅली काढली आहे, असे मुख्यमंत्रि हेमंता बिस्वा सर्मा यांनी यावेळी सांगितले. या रॅलीचा समारोप नेहरू स्टेडियममध्ये झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवलिनाचे वडील टिकेन बोर्गोहेन यांचा सत्कार करण्यात आला. 23 वर्षीय लवलिना हिने गतवर्षी मार्च महिन्यात टोकियो ऑलिम्पिकसाठी आपली पात्रता सिद्ध केली. ती 69 किग्रॅ वेल्टर वेट वजनगटात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.