पैसे चोरण्यासाठी स्फोटकांनी उडवले एटीएम

    दिनांक :21-Jul-2021
|
- नव्या पद्धतीमुळे पोलिस चक्रावले
पुणे, 
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील चाकणमधल्या भांबोली फाटा इथे बुधवारी पहाटे चोरांनी स्फोटकांनी एटीएम उडवून 25 ते 30 लाख रुपयांची रोकड घेत पळ काढला. या चोरीसाठी चोरांनी उच्च दर्जाची स्फोटके वापरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चोरीच्या या नव्या पद्धतीने पोलिस चक्रावले आहेत.

maha_1  H x W:
 
बुधवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास अज्ञात चोरांंनी एटीएममध्ये स्फोट केला. हा स्फोट अत्यंत भीषण स्वरूपाचा होता. यात एटीएमचे शटर तुटले असून, परिसर या स्फोटाच्या आवाजाने हादरला. स्फोटकाच्या सहाय्याने एटीएम फोडल्याची ही पहिलीच घटना असल्याचे पोलिस उपायुक्तांनी सांगितले. या स्फोटात आयईडीचा वापर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या चोरीचा तपास पिंपरी चिंचवड पोलिसांसह दहशतवादविरोधी पथक (एटीएस), केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (बीडीडीएस) सुरू केला आहे. पैसे लुटण्याच्या या नवीन पद्धतीमुळे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.