8 ऑगस्टला पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा

    दिनांक :21-Jul-2021
|
- वर्षा गायकवाड यांची माहिती
मुंबई,  
कोरोना प्रादुर्भावामुळे सातत्याने पुढे ढकलण्यात आलेली पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 8 ऑगस्ट रोजी होणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मंगळवारी दिली. कोरोना नियमांचे पालन करून ही परीक्षा होणार असल्याची माहिती गायकवाड यांनी ट्विट करीत दिली. ही परीक्षा घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने मान्यता देण्यात आल्याचे स्पष्ट करीत त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
 

varsha _1  H x  
 
शिष्यवृत्ती परीक्षेबाबत माहिती देताना वर्षा गायकवाड यांनी ट्विट केले आहे. 2020-21 सालातील पाचवीसाठी घेतली जाणारी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व आठवीसाठी घेतली जाणारी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून 8 ऑगस्ट रोजी घेण्यास शालेय शिक्षण विभागाच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे. परीक्षार्थींना शुभेच्छा, असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.